Tuesday, December 23, 2008

श्रीव्यंकटेशाची आरती


श्रीव्यंकटेशाची आरती
शेषाचलअवतार तारक तूं देवा ।
सुरवरमुनिवर करिती जन सेवा ।
कमळारमणा अससी अगणित गुणठेवा ।
कमळाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा । । १ । ।

जय देव जय देव जय व्यंकटेशा । ।
केवल करुणा सिंधु पुरवीसी आशा । । ध्रु । ।

हें निजवैकुंठ म्हणुनी ध्यातों मी तूंतें ।
दाखविसी गुण कैसे सकळिक लोकांतें ।
देखुनि तूझें स्वरूप सुख अदभुत होतें ।
ध्यातों तुजला श्रीपति ध्रुढ मानस होतें । । २ । ।

जय देव जय देव जय व्यंकटेशा । ।
केवल करुणा सिंधु पुरवीसी आशा । । ध्रु । ।


श्री गोंदवलेकर महाराजांचे विचार सौंदर्य
भगवंताची संगत धरली तर त्याच्याइतकें सामर्थ्य येईल ।

बोधवचने
जोवर तुमची स्वतःवर श्रद्धा नाही, तोवर तुम्ही ईश्र्वरावर श्रद्धा ठेवू शकणार नाही ।
स्वामी विवेकानंद


मनाचे श्लोक

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमूं पंथ आनंत या राघवाचा । । १ । ।

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ।
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावें ।
जनीं वंद्य ते सर्व भावें करावें । । २ । ।
(क्रमशः )

Sunday, December 14, 2008

श्रीखंडेरायाची आरती



। । श्रीखंडेरायाची आरती । ।
जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार ।
म्रुत्युलोकिं दुसरें कैलासशिखर ।
नानापरिंची रचना रचिली अपार ।
तये स्थळीं नांदे स्वामी शंकर । । १ । ।
जय देव जय देव जय शिव मार्तंडा ।
अरिमर्दन मल्लारी तूंचि प्रचंडा । । धृ । ।

मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला ।
देवगण गंधर्व कांपती त्याला । । २ । ।
जय देव जय देव जय शिव मार्तंडा ।
अरिमर्दन मल्लारी तूंचि प्रचंडा । । धृ । ।

चंपाषष्ठी दिवशीं अवतार धरिसी ।
मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी ।
चरणीं पृष्ठीं खड्गें वर्मी स्थापीसी ।
अंतीँ वर देऊनि त्या मुक्तितें देसी । । ३ । ।
जय देव जय देव जय शिव मार्तंडा ।
अरिमर्दन मल्लारी तूंचि प्रचंडा । । धृ । ।

मणिमल्लदैत्य मर्दुनी मल्लारी ।
देवा संकट पडतां राहे जेजुरीँ ।
अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी ।
देवा ठाव मागे दास नरहरी । । ४ । ।

जय देव जय देव जय शिव मार्तंडा ।
अरिमर्दन मल्लारी तूंचि प्रचंडा । । धृ । ।

श्रीगोंदवलेकर महाराजांचे विचार सौंदर्य
४) देहाचा विसर हेंच खरें आनंदाचे चिन्ह आहे ।

उग्दार आणि बोधवचने
सामर्थ्य हे भलेपणात आहे, पावित्र्यात आहे ।