Tuesday, February 17, 2009

श्रीनृसिंहाची आरती

श्रीनृसिंहाची आरती
कडकडिले स्तंभ गडगडिलें गगन |
अवनी होत आहे कंपायमान |
तडतडलीं नक्षत्रें पडताती जाण |
उग्ररुपें प्रकटे तो सिंहवदन || ||
जय देव जय देव जय नरहरिराया |
आरती ओवाळूं महाराजवर्या || धृ ||

एकविस स्वर्गमाळा डळमळली कैसी |
ब्रह्मयाच्या वाटे अभिनव चित्तासी |
चंद्रसूर्य दोनी लोपति प्रकाशीं |
कैलासीं शंकर दचके मानसीं || ||
जय देव जय देव जय नरहरिराया |
आरती ओवाळूं महाराजवर्या || धृ ||

थरथरती त्या जटा जिव्हां लळलळित |
तीक्ष्ण नखांनीं तो दैत्य विदारीत |
अर्धांगी कमलजा शिरिं छाया धरित |
माधवदासा स्वामी नरहरि शोभत || ||
जय देव जय देव जय नरहरिराया |
आरती ओवाळूं महाराजवर्या || धृ ||

|| श्री गोंदवलेकर महाराजांचे विचारसौन्दर्य ||
संतांच्या सहवासानें वासना हळुहळु मरुं लागतात॰

उग्दार आणि बोधवचने
आपण अस्सल होण्याकरिता पराकाष्ठेचा प्रयत्न केला पाहिजे॰

मनाचे श्र्लोक
नको रे मना द्रव्य तें पूढिलांचें |
अति स्वार्थबुध्दी रे पाप साचें |
घडे भोगणें पाप तें कर्म खोटे |
होतां मनासारिखें दुः मोठें || ||
सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी |
दुःखाचीं स्वयें सांड जीवीं करावी |
देहेदुःख तें सुख मानीत जावें |
विवेकें सदा स्वस्वरुपिं भजावें || १० ||