Thursday, November 13, 2008

श्रीकार्तिकस्वामींची आरती


। । श्रीकार्तिकस्वामींची आरती । ।

जय देव जय देव जय श्रीकार्तिकदेवा ।
तुझिया चरणांची नित्य घडो सेवा । । ध्रु । ।
शिव पार्वतिचा तू ज्येष्ठ नंदन ।
सुरवर करिती तुजला नित्य वंदन ।
सेनानी देवांचा तू शोभसी खरा ।
तुझे नाम घेता भय पडले असुरा । । १ । ।
जय देव जय देव जय श्रीकार्तिकदेवा ।
तुझिया चरणांची नित्य घडो सेवा । । ध्रु । ।

कृत्तिकांनी करविले तुजला स्तनपान ।
मयुर पक्षाचे तुजला शोभे वाहन ।
दर्शनमात्रे तुझिया पापे ती हरती ।
भक्तां तुझिया लाभे श्री यश संपत्ती । । २ । ।
जय देव जय देव जय श्रीकार्तिकदेवा ।
तुझिया चरणांची नित्य घडो सेवा । । ध्रु । ।

रचयिता : वि के फडके

श्रीगोंदवलेकर महाराजांचे विचारसौंदर्य
देहाचा विसर हेंच खरें आनंदाचें चिह्न आहे ।
उद्गार आणि बोधवचने
मला माझ्या बांधवांना साहाय्य करू द्या
एवढीच माझी इच्छा आहे ।
स्वामी विवेकानंद

Saturday, November 8, 2008

श्रीजिवतीची आरती


श्रीजिवतीची आरती
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी
सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।
श्रावण येतांचि आणूं प्रतिमा ।
गृहांत स्थापूनि करू पूजना ।
आघाडा दुर्वा माळा वाहूंया ।
अक्षता घेऊन कहाणी सांगू या ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी
सुखी ठेवी संतति विनति तवचरणी । । १ । ।
पुरणपोळीचा नैवेद्य दावूं ।
सुवासिनींना भोजन देऊं ।
चणे हळदीकुंकू दूधहि
देऊं ।
जमूनि आनंदे आरती गाऊं ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी
सुखी ठेवी संतति विनति तवचरणी । । २ । ।


सटवीची बाधा होई बाळांना
सोडवी तींतून तूचि तयांना
माता यां तुजला करिती प्रार्थना
पूर्ण ही करी मनोकामना
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी
सुखी ठेवी संतति विनति तवचरणी । । ३ । ।
तुझिया कृपेने सौख्य नांदू दे ।
वंशाचा वेल नीट वाढूं दे ।
सेवा हे व्रत नित्य घडूं दे ।
मनींचे हेतू पूर्ण होऊंदे ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी
सुखी ठेवी संतति विनति तवचरणी । । ४ । ।


श्रीगोंदवलेकर महाराजांचे विचारसौंदर्य
पैशानें सुखी झाला असा मनुष्य मी पाहिला नाही .











Saturday, November 1, 2008

श्री वटसावित्रीची आरती


॥ श्री वटसावित्रीची आरती ॥
अश्वपती पुसता झाला ॥
नारद सांगताती तयाला ॥
अल्पायुषी सत्यवंत ॥
सावित्रीनें कां प्रणीला ॥
आणखी वर वरी बाळे ॥
मनीं निश्चय केला ॥ १

आरती वडराजा ॥
दयावंत यमदूता ॥
सत्यवंत ही सावित्री ॥
भावें करीन मी पूजा ॥
आरती वडराजा ध्रु

ज्येष्ठमास त्रयोदशी
करिती पूजन वडाशीं
त्रिरात्र व्रत करुनियां
जिंकी तू सत्यवंताशीं

आरती वडराजा
दयावंत यमदूता
सत्यवंत ही सावित्री
भावें करीन मी पूजा
आरती वडराजा ध्रु

स्वर्गावरी जाऊनियां
अग्निखांब कवळीला
धर्मराजा उचकला
ह्त्या घालिल जीवाला
येई गे पतिव्रते
पति नेई गे आपुला

आरती वडराजा
दयावंत यमदूता
सत्यवंत ही सावित्री
भावें करीन मी पूजा
आरती वडराजा ध्रु

जाऊनियां यमापाशीं ॥
मागतसे आपुला पती
चारी वर देऊनियां
दयावंता द्यावा पती

आरती वडराजा
दयावंत यमदूता
सत्यवंत ही सावित्री
भावें करीन मी पूजा
आरती वडराजा ध्रु

पतिव्रते तुझी कीर्ति
ऐकुनि ज्या नारी
तुझें व्रतें आचरती
तुझीं भुवनें पावती

आरती वडराजा
दयावंत यमदूता
सत्यवंत ही सावित्री
भावें करीन मी पूजा
आरती वडराजा ध्रु

पतिव्रते तुझी स्तुती
त्रिभुवनीं ज्या करिती
स्वर्गी पुष्पवृष्टीं करुनीयां
आणिलासी आपुला पती अभय देऊनियां
पतिव्रते तारी त्यासी

आरती वडराजा
दयावंत यमदूता
सत्यवंत ही सावित्री
भावें करीन मी पूजा
आरती वडराजा ध्रु


श्री गोंदवलेकर महाराजांचे विचार सौंदर्य
परमार्थांत व्यवहार येणारच , पण तो स्वार्थमूलक नसावा