Tuesday, December 23, 2008

श्रीव्यंकटेशाची आरती


श्रीव्यंकटेशाची आरती
शेषाचलअवतार तारक तूं देवा
सुरवरमुनिवर करिती जन सेवा
कमळारमणा अससी अगणित गुणठेवा
कमळाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा

जय देव जय देव जय व्यंकटेशा
केवल करुणा सिंधु पुरवीसी आशा ध्रु

हें निजवैकुंठ म्हणुनी ध्यातों मी तूंतें
दाखविसी गुण कैसे सकळिक लोकांतें
देखुनि तूझें स्वरूप सुख अदभुत होतें
ध्यातों तुजला श्रीपति ध्रुढ मानस होतें

जय देव जय देव जय व्यंकटेशा
केवल करुणा सिंधु पुरवीसी आशा ध्रु


श्री गोंदवलेकर महाराजांचे विचार सौंदर्य
भगवंताची संगत धरली तर त्याच्याइतकें सामर्थ्य येईल

बोधवचने
जोवर तुमची स्वतःवर श्रद्धा नाही, तोवर तुम्ही ईश्र्वरावर श्रद्धा ठेवू शकणार नाही
स्वामी विवेकानंद


मनाचे श्लोक

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा
गमूं पंथ आनंत या राघवाचा । । । ।

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावें
जनीं वंद्य ते सर्व भावें करावें । । । ।
(क्रमशः )

Sunday, December 14, 2008

श्रीखंडेरायाची आरती



। । श्रीखंडेरायाची आरती । ।
जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार ।
म्रुत्युलोकिं दुसरें कैलासशिखर ।
नानापरिंची रचना रचिली अपार ।
तये स्थळीं नांदे स्वामी शंकर । । १ । ।
जय देव जय देव जय शिव मार्तंडा ।
अरिमर्दन मल्लारी तूंचि प्रचंडा । । धृ । ।

मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला ।
देवगण गंधर्व कांपती त्याला । । २ । ।
जय देव जय देव जय शिव मार्तंडा ।
अरिमर्दन मल्लारी तूंचि प्रचंडा । । धृ । ।

चंपाषष्ठी दिवशीं अवतार धरिसी ।
मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी ।
चरणीं पृष्ठीं खड्गें वर्मी स्थापीसी ।
अंतीँ वर देऊनि त्या मुक्तितें देसी । । ३ । ।
जय देव जय देव जय शिव मार्तंडा ।
अरिमर्दन मल्लारी तूंचि प्रचंडा । । धृ । ।

मणिमल्लदैत्य मर्दुनी मल्लारी ।
देवा संकट पडतां राहे जेजुरीँ ।
अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी ।
देवा ठाव मागे दास नरहरी । । ४ । ।

जय देव जय देव जय शिव मार्तंडा ।
अरिमर्दन मल्लारी तूंचि प्रचंडा । । धृ । ।

श्रीगोंदवलेकर महाराजांचे विचार सौंदर्य
४) देहाचा विसर हेंच खरें आनंदाचे चिन्ह आहे ।

उग्दार आणि बोधवचने
सामर्थ्य हे भलेपणात आहे, पावित्र्यात आहे ।

Thursday, November 13, 2008

श्रीकार्तिकस्वामींची आरती


। । श्रीकार्तिकस्वामींची आरती । ।

जय देव जय देव जय श्रीकार्तिकदेवा ।
तुझिया चरणांची नित्य घडो सेवा । । ध्रु । ।
शिव पार्वतिचा तू ज्येष्ठ नंदन ।
सुरवर करिती तुजला नित्य वंदन ।
सेनानी देवांचा तू शोभसी खरा ।
तुझे नाम घेता भय पडले असुरा । । १ । ।
जय देव जय देव जय श्रीकार्तिकदेवा ।
तुझिया चरणांची नित्य घडो सेवा । । ध्रु । ।

कृत्तिकांनी करविले तुजला स्तनपान ।
मयुर पक्षाचे तुजला शोभे वाहन ।
दर्शनमात्रे तुझिया पापे ती हरती ।
भक्तां तुझिया लाभे श्री यश संपत्ती । । २ । ।
जय देव जय देव जय श्रीकार्तिकदेवा ।
तुझिया चरणांची नित्य घडो सेवा । । ध्रु । ।

रचयिता : वि के फडके

श्रीगोंदवलेकर महाराजांचे विचारसौंदर्य
देहाचा विसर हेंच खरें आनंदाचें चिह्न आहे ।
उद्गार आणि बोधवचने
मला माझ्या बांधवांना साहाय्य करू द्या
एवढीच माझी इच्छा आहे ।
स्वामी विवेकानंद

Saturday, November 8, 2008

श्रीजिवतीची आरती


श्रीजिवतीची आरती
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी
सुखी ठेवी संतति विनति तवचरणी ।
श्रावण येतांचि आणूं प्रतिमा ।
गृहांत स्थापूनि करू पूजना ।
आघाडा दुर्वा माळा वाहूंया ।
अक्षता घेऊन कहाणी सांगू या ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी
सुखी ठेवी संतति विनति तवचरणी । । १ । ।
पुरणपोळीचा नैवेद्य दावूं ।
सुवासिनींना भोजन देऊं ।
चणे हळदीकुंकू दूधहि
देऊं ।
जमूनि आनंदे आरती गाऊं ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी
सुखी ठेवी संतति विनति तवचरणी । । २ । ।


सटवीची बाधा होई बाळांना
सोडवी तींतून तूचि तयांना
माता यां तुजला करिती प्रार्थना
पूर्ण ही करी मनोकामना
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी
सुखी ठेवी संतति विनति तवचरणी । । ३ । ।
तुझिया कृपेने सौख्य नांदू दे ।
वंशाचा वेल नीट वाढूं दे ।
सेवा हे व्रत नित्य घडूं दे ।
मनींचे हेतू पूर्ण होऊंदे ।
जयदेवी जयदेवी जय जिवती जननी
सुखी ठेवी संतति विनति तवचरणी । । ४ । ।


श्रीगोंदवलेकर महाराजांचे विचारसौंदर्य
पैशानें सुखी झाला असा मनुष्य मी पाहिला नाही .











Saturday, November 1, 2008

श्री वटसावित्रीची आरती


॥ श्री वटसावित्रीची आरती ॥
अश्वपती पुसता झाला ॥
नारद सांगताती तयाला ॥
अल्पायुषी सत्यवंत ॥
सावित्रीनें कां प्रणीला ॥
आणखी वर वरी बाळे ॥
मनीं निश्चय केला ॥ १

आरती वडराजा ॥
दयावंत यमदूता ॥
सत्यवंत ही सावित्री ॥
भावें करीन मी पूजा ॥
आरती वडराजा ध्रु

ज्येष्ठमास त्रयोदशी
करिती पूजन वडाशीं
त्रिरात्र व्रत करुनियां
जिंकी तू सत्यवंताशीं

आरती वडराजा
दयावंत यमदूता
सत्यवंत ही सावित्री
भावें करीन मी पूजा
आरती वडराजा ध्रु

स्वर्गावरी जाऊनियां
अग्निखांब कवळीला
धर्मराजा उचकला
ह्त्या घालिल जीवाला
येई गे पतिव्रते
पति नेई गे आपुला

आरती वडराजा
दयावंत यमदूता
सत्यवंत ही सावित्री
भावें करीन मी पूजा
आरती वडराजा ध्रु

जाऊनियां यमापाशीं ॥
मागतसे आपुला पती
चारी वर देऊनियां
दयावंता द्यावा पती

आरती वडराजा
दयावंत यमदूता
सत्यवंत ही सावित्री
भावें करीन मी पूजा
आरती वडराजा ध्रु

पतिव्रते तुझी कीर्ति
ऐकुनि ज्या नारी
तुझें व्रतें आचरती
तुझीं भुवनें पावती

आरती वडराजा
दयावंत यमदूता
सत्यवंत ही सावित्री
भावें करीन मी पूजा
आरती वडराजा ध्रु

पतिव्रते तुझी स्तुती
त्रिभुवनीं ज्या करिती
स्वर्गी पुष्पवृष्टीं करुनीयां
आणिलासी आपुला पती अभय देऊनियां
पतिव्रते तारी त्यासी

आरती वडराजा
दयावंत यमदूता
सत्यवंत ही सावित्री
भावें करीन मी पूजा
आरती वडराजा ध्रु


श्री गोंदवलेकर महाराजांचे विचार सौंदर्य
परमार्थांत व्यवहार येणारच , पण तो स्वार्थमूलक नसावा













Tuesday, October 28, 2008

श्री महालक्ष्मीची आरती


श्री महालक्ष्मीची आरती

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं
॥ ध्रु ॥
करविरपुरवासिनी सुरवरमुनिमाता ।
पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता । ।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता ।
सहस्रवदनीं भूधर न पुरे गुण गातां । । १ । ।
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं
॥ ध्रु ॥

मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं ।
झळके हाटक-वाटी पीयुषरसपाणी ॥
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी ।
शशिकरवदना राजस मदनाची जननी । । २ । ।
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं
॥ ध्रु ॥

ताराशक्ति अगम्या शिवभजकां गौरी ।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारीं । ।
गायत्री निजबीजा निगमागम सारी ।
प्रकटे पद्मावती निजधर्माचारी । । ३ । ।
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं
॥ ध्रु ॥

अमृतभरिते सरिते अधदुरिते वारीं ।
मारीं दुर्घट असुरां भव दुस्तर तारी । ।
वारीं मायापटल प्रणमत परिवारी ।
हें रूप चिद्रुप तद्रुप दावीं निर्धारीं । । ४ । ।
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं
॥ ध्रु ॥

चतुरानने कुश्चित कर्माच्या ओळी ।
लिहिल्या असतील माते माझे निजभाळी । ।
पुसोनी चरणतळीं पदसुमनें क्षाळी ।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी । । ५ । ।
जय देवी जय देवी जय महालक्ष्मी ।
वससी व्यापकरुपें तू स्थूलसूक्ष्मीं
॥ ध्रु ॥

श्री गोंदवलेकर महाराजांचे विचार सौंदर्य

) जगाच्या कल्याणार्थ संत व भगवंत येतात ।




Friday, October 24, 2008

श्री विष्णूची आरती


श्रीविष्णूची आरती
आवडी गंगाजळें देवा न्हाणीलें
भक्तिचें भूषण प्रेमसुगंध अर्पिलें
अहं हां धूप जाळूं श्रीहरीपुढें
जवं जवं धूप जळे
तवं तवं देवा आवडे
रमावल्लभदासें अहंधूप जाळिला
एकारतिचा मग प्रारंभ केला
सोहं हां दीप ओंवाळू गोविंदा
समाधी लागली पाहतां मुखारविंदा
हरिख हरिख होतो मुख पाहतां
प्रकटल्या या नारी सर्वहि अवस्था
सभ्दावालागी बहु हां देव भुकेला
रमावल्लभदासें अहं नैवेद्य अर्पिला
फल तांबूल दक्षिणा अर्पिली
तयाउपरी नीरांजनें मांडिली
आरती आरती करूं गोपाळा
मीतूंपण सांडोनी वेळोवेळाध्रु
पंचप्राण पंचज्योती आरती उजळिली
दृश्य हें लोपलें तया प्रकाशांतळिं
आरतीप्रकाशे चंद्र सूर्य लोपले
सुरवर नभीं तेथे तटस्थ ठेले
देवभक्तपण दिसें कांहीं
ऐशापरी दास रमावल्लभ पायीं
आरती आरती करूं गोपाळा
मीतूंपण सांडोनी वेळोवेळाध्रु









Sunday, September 21, 2008

श्रीविठ्ठलाची आरती


श्रीविठ्ठलाची आरती

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा |

वामांगीं रखुमाई

दिसे दिव्य शोभा |

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा |

चरणीं वाहें भीमा उध्दरी जगा || ||

जय देव जय देव जय पांडुरंगा |

रखुमाईवल्लभा राईचा वल्लभा पावें जिवलगा |

जय देव जय देव || धृ. ||

तुलसीमाला गळां कर ठेवूनि कटीं |

कांसे पीतांबर कस्तूरी लल्लाटीं |

देव सुरवर नित्य येती भेटी |

गरुड़ हनुमंत पुढें उभे राहती || ||

जय देव जय देव जय पांडुरंगा |

रखुमाईवल्लभा राईचा वल्लभा पावें जिवलगा |

जय देव जय देव || धृ. ||

धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा |

सुवर्णाची कमळें वनमाला गळां |

राही रखुमाबाई राणीया सकळा |

ओंवाळिती राजा विठोबा सांवळा || ||

जय देव जय देव जय पांडुरंगा |

रखुमाईवल्लभा राईचा वल्लभा पावें जिवलगा |

जय देव जय देव || धृ. ||

ओंवाळूं आरत्या कुर्वंड्या येती |

चंद्रभागेमाजीं सोडूनियां देती |

दिंड्या पताका वैष्णव नाचती |

पंढरीचा महिमा वर्णावा किती || ||

जय देव जय देव जय पांडुरंगा |

रखुमाईवल्लभा राईचा वल्लभा पावें जिवलगा |

जय देव जय देव || धृ. ||

आषाढी कार्तिकी भक्तजन येती |

चंद्र्भागेमध्यें स्नानें जे करिती |

दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ती |

केशवासी नामदेव भावे ओंवाळीती || ||

जय देव जय देव जय पांडुरंगा |

रखुमाईवल्लभा राईचा वल्लभा पावें जिवलगा |

जय देव जय देव ||


Thursday, September 18, 2008

श्रीरामचंद्राची आरती


श्रीरामचंद्राची आरती

उत्कट साधुनि शिळा सेतु बांधोनी |

लिंगदेह लंकापुर विध्वंसूनी |

कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी |

देहअहंभाव रावण निवटोनी || 1 ||

जय देव जय देव निजबोधा रामा |

परमार्थे आरती, सद्भावे आरती परिपूर्णकामा |

जय देव जय देव || ध्रु.||

प्रथम सीताशुध्दी हनुमंत गेला |

लंका दहन करुनी अखया मारिला |

मारिला जंबूमाळी भुवनीं त्राहाटीला |

आनंदाची गुढी घेऊनियां आला | | २ ||

जय देव जय देव निजबोधा रामा |

परमार्थे आरती, सद्भावे आरती परिपूर्णकामा |

जय देव जय देव || ध्रु.||

निजबळें निजशक्ति सोडविली सीता |

म्हणूनी येणें झाले अयोध्वे रघुनाथा |

आनंदें वोसंडे वैराग्य भरता |

आरती घेउन आली कौसल्या माता || ३ ||

जय देव जय देव निजबोधा रामा |

परमार्थे आरती, सद्भावे आरती परिपूर्णकामा |

जय देव जय देव || ध्रु.||

अनाहतध्वनी गर्जति अपार |

अठरा पद्में वानर करिती भुभु:कार |

अवोध्येसी आले दशरथ कुमार |

नगरीं होत आहे आनंद थोर || ४ ||

जय देव जय देव निजबोधा रामा |

परमार्थे आरती, सद्भावे आरती परिपूर्णकामा |

जय देव जय देव || ध्रु.||

सहज सिंहासनीं राजा रघुवीर |

सोहंभावें तया पूजा उपचार |

सहजांची आरती वाद्यांचा गजर |

माधवदासा स्वामी आठव ना विसर || ५ ||

जय देव जय देव निजबोधा रामा |

परमार्थे आरती, सद्भावे आरती परिपूर्णकामा |

जय देव जय देव || ध्रु.||

Wednesday, September 17, 2008

श्री दत्ताची आरती


श्री दत्ताची आरती

त्रिगुणात्मक त्रवमूर्ती दत हा जाणा |

त्रिगुणीं अवतार त्रैलोक्यराणा |

नेति नेति शब्दें न ये अनुमाना |

सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना || १ ||

जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता |

आरती ओवाळितां हरली भवचिंता |

जय देव जय देव || ध्रु. ||

सबाह्य अभ्यंतरीं तूं एक दत्त |

अभाग्यासी कैंची कळेल ही मात |

पराही परतली तेथें कैंचा हा हेत |

जन्ममरणाचाही पुरलासे अंत |

जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता |

आरती ओवाळितां हरली भवचिंता |

जय देव जय देव || २ ||

दत येऊनियां उभा ठाकला |

सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला |

प्रसन्न होउनी आशीर्वाद दिधला |

जन्ममरणाचा फेरा चुकवीला |

जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता |

आरती ओवाळितां हरली भवचिंता |

जय देव जय देव || ३ ||

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान |

हारपले मन झालें उन्मन |

मींतूपणाची झाली बोळवण |

एकाजनार्दनीं श्रीदतध्यान |

जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता |

आरती ओवाळितां हरली भवचिंता |

जय देव जय देव || ४ ||

Tuesday, September 16, 2008

मारुतीची आरती


मारुतीची आरती
सत्राणें उड़्ड़ाणें हुंकार वदनी |
करि डळमळ भूमंड़ळ सिंधूजळ गगनीं |
कडाडिले ब्रह्मांड धाक त्रिभुवनी |
सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी || १ ||

जय देव जय देव जय श्रीहनुमंता |
तुमचेनी प्रसादे न मी कृतांता |
जय जय देव || ध्रु ||

दुमदुमलें पाताळ उठिला प्रतिशब्द |
थरथरला धरणीधर मानीला खेद |
कडकड़िले पर्वत उडुगण उच्छेद |
रामीं रामदासा शक्तीचा शोध | | २ ||

जय देव जय देव जय श्रीहनुमंता |
तुमचेनी प्रसादे न मी कृतांता |
जय जय देव ||

Saturday, September 13, 2008

श्री शंकराची आरती


श्री शंकराची आरती
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ||
विषें कंठ काळा त्रिनेत्रिं ज्वाळा ||
लावण्यसुदंर मस्तकीं बाळा ||
तेथुनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां || ||

जय देव जय देव जय श्रीशंकरा ||
आरती ओवाळूं तुज कर्पुरगौरा ||
जय देव जय देव || धृ॰ ||

कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा ||
अर्धागी पार्वती सुमनांच्या माळा ||
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ||
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा || ||

जय देव जय देव जय श्रीशंकरा ||
आरती ओवाळूं तुज कर्पुरगौरा ||
जय देव जय देव || धृ॰ ||

देवीं दैत्ये सागरमंथन पैं केलें ||
त्यामाजी अवचित हालाहल जे उठिलें ||
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ||
निलकंठ नाम प्रसिद्ध झाले || ||

जय देव जय देव जय श्रीशंकरा ||
आरती ओवाळूं तुज कर्पुरगौरा ||
जय देव जय देव || धृ॰ ||

व्याघ्रांबर फ़णिवरधर सुंदर मदनारी ||
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ||
शतकोटींचें बीज वाचे उच्चारी ||
रघुकुळतिळक राम दासा अंतरी || ||

जय देव जय देव जय श्रीशंकरा ||
आरती ओवाळूं तुज कर्पुरगौरा ||
जय देव जय देव || धृ॰ ||

Monday, September 8, 2008

दुर्गादेवीची आरती


दुर्गादेवीची आरती
दुर्गेदुर्घट भारी तुजविण संसारी |
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी |
वारी वारी जन्म मरणाते वारी |
हारी पडलो आता संकट निवारी |
१ |

जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी |
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी |
जय देवी जय देवी || ध्रृ ||

त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसी नाही |
चारी श्रमले परंतु बोलवे काही |
साही विवाद करीता पडले प्रवाही |
ते तू भक्तांलागी पावसि लवलाही || ||

जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी |
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी |
जय देवी जय देवी

प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा |
क्लेशापासूनी सोडवी तोडी भवपाशा |
अंबे तुजवाचून कोण पुरविल आशा |
नरहरि तल्लीन झाला पदपंकज़लेशा || ३ ||

जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी |
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी |
जय देवी जय देवी


दुर्गादेवीची आरती