Saturday, November 1, 2008

श्री वटसावित्रीची आरती


॥ श्री वटसावित्रीची आरती ॥
अश्वपती पुसता झाला ॥
नारद सांगताती तयाला ॥
अल्पायुषी सत्यवंत ॥
सावित्रीनें कां प्रणीला ॥
आणखी वर वरी बाळे ॥
मनीं निश्चय केला ॥ १

आरती वडराजा ॥
दयावंत यमदूता ॥
सत्यवंत ही सावित्री ॥
भावें करीन मी पूजा ॥
आरती वडराजा ध्रु

ज्येष्ठमास त्रयोदशी
करिती पूजन वडाशीं
त्रिरात्र व्रत करुनियां
जिंकी तू सत्यवंताशीं

आरती वडराजा
दयावंत यमदूता
सत्यवंत ही सावित्री
भावें करीन मी पूजा
आरती वडराजा ध्रु

स्वर्गावरी जाऊनियां
अग्निखांब कवळीला
धर्मराजा उचकला
ह्त्या घालिल जीवाला
येई गे पतिव्रते
पति नेई गे आपुला

आरती वडराजा
दयावंत यमदूता
सत्यवंत ही सावित्री
भावें करीन मी पूजा
आरती वडराजा ध्रु

जाऊनियां यमापाशीं ॥
मागतसे आपुला पती
चारी वर देऊनियां
दयावंता द्यावा पती

आरती वडराजा
दयावंत यमदूता
सत्यवंत ही सावित्री
भावें करीन मी पूजा
आरती वडराजा ध्रु

पतिव्रते तुझी कीर्ति
ऐकुनि ज्या नारी
तुझें व्रतें आचरती
तुझीं भुवनें पावती

आरती वडराजा
दयावंत यमदूता
सत्यवंत ही सावित्री
भावें करीन मी पूजा
आरती वडराजा ध्रु

पतिव्रते तुझी स्तुती
त्रिभुवनीं ज्या करिती
स्वर्गी पुष्पवृष्टीं करुनीयां
आणिलासी आपुला पती अभय देऊनियां
पतिव्रते तारी त्यासी

आरती वडराजा
दयावंत यमदूता
सत्यवंत ही सावित्री
भावें करीन मी पूजा
आरती वडराजा ध्रु


श्री गोंदवलेकर महाराजांचे विचार सौंदर्य
परमार्थांत व्यवहार येणारच , पण तो स्वार्थमूलक नसावा