Wednesday, March 4, 2009

हाचि सुबोध गुरूंचा

हाचि सुबोध गुरूंचा

नाम सदा बोलावे, गावे भावे, जनांसि सांगावे |
हाचि सुबोध गुरूंचा, नामापरते सत्य मानावे || ||
नामात रंगुनीया व्यवहारी सर्व भोग सेवावे |
हाचि सुबोध गुरूंचा, भोगासंगे कुठे गुंतावे || ||
आनंदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे |
हाचि सुबोध गुरूंचा, अनुसंधाना कधी चुकवावे || ||
गोड सदा बोलावे, नम्रपणें, सर्व लोकप्रिय व्हावे |
हाचि सुबोध गुरूंचा, भक्तीने रघुपतीस आळवावे || ||
स्वांतर शुध्द असावे, कपटाचरणा कधी वश व्हावे |
हाचि सुबोध गुरूंचा, मन कोणाचे कधी दुखवावे || ||
' माझा राम सखा, मी रामाचा दास,' नित्य बोलावे |
हाचि सुबोध गुरूंचा, रामापाशी अनन्य वागावे || ||
यत्न कसून करिन मी, यश दे, रामा, दे, तुझी सत्ता |
हाचि सुबोध गुरूंचा, मानावा राम सर्वथा कर्ता || ||
आचारसंयमाने युक्त असा नीतिधर्म पाळावा |
हाचि सुबोध गुरूंचा, खेळाऐसा प्रपंच मानावा || ||
दाता राम सुखाचा, संसारा मान तू प्रभूसेवा |
हाचि सुबोध गुरूंचा, संतोषा सर्वदा मनी ठेवा || ||
स्वार्थ खरा साधा रे, नित्य तुम्ही नामगायनी जागा |
हाचि सुबोध गुरूंचा, मीपण जाळोनिया जगी वागा || १० ||
अभिमान शत्रु मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने |
हाचि सुबोध गुरूंचा, मारावा तो समूळ नामाने || ११ ||
राज्याधिकार येवो, किंवा जावो समस्त धन मान |
हाचि सुबोध गुरूंचा, भंगावे ना कदा समाधान || १२ ||
प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगामाजी |
हाचि सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची || १३ ||


|| जानकीजीवनस्मरण जय जय राम ||
रचयिता: प्रा॰ के॰ वि॰ बेलसरे

| श्रीगोंदवलेकर महाराजांचे विचार सौंदर्य |

आयत्या वेळीं स्मरण होणें ही उपासना॰

उग्दार आणि बोधवचने

मनावर ताबा कसा मिळवावा हे प्रथम शिकावे॰
-- स्वामी विवेकानंद॰

मनाचे श्र्लोक

जनीं सर्वसूखी असा कोण आहे |
विचारी मना तूंचि शोधूनी पाहें |
मना त्वांचि रे पूर्व संचीत केले |
तयासारिखें भोगणें प्राप्त झालें || ११ ||
मना मानसीं दुःख आणूं नको रे |
मना सर्वथा शोक चिंता नको रे |
विवेकें देहेबुध्दि सोडूनि द्यावी |
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी || १२ ||