Saturday, January 17, 2009

श्रीकृष्णाची आरती


||श्रीकृष्णाची आरती ||

ओंवाळूं आरती मदनगोपाळा |
श्यामसुंदर गळां वैजयंती माळा || धृ॰ ||

चरणकमल ज्याचे अति सुकुमार |
ध्वजवज्रांकुश ब्रीदाचे तोडर || ||

ओंवाळूं आरती मदनगोपाळा |
श्यामसुंदर गळां वैजयंती माळा || धृ॰ ||

नाभिकमलीं ज्याचें ब्रह्मयाचें स्थान |
हृदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन || ||

ओंवाळूं आरती मदनगोपाळा |
श्यामसुंदर गळां वैजयंती माळा || धृ॰ ||

मुखकमल पाहतां सूर्याचिया कोटी |
वेधलें मानस हारपली दृष्टी || ||

ओंवाळूं आरती मदनगोपाळा |
श्यामसुंदर गळां वैजयंती माळा || धृ॰ ||

जडित मुगुट ज्याचा दैदीप्यमान |
तेणें तेजें कोंदले अवघें त्रिभुवन || ||

ओंवाळूं आरती मदनगोपाळा |
श्यामसुंदर गळां वैजयंती माळा || धृ॰ ||

एका जनार्दनीँ देखियलें रूप |
रूप पाहतां जाहलें अवघें तद्रूप || ||

ओंवाळूं आरती मदनगोपाळा |
श्यामसुंदर गळां वैजयंती माळा || धृ॰ ||

श्रीगोंदवलेकर महाराजांचे विचार सौंदर्य

भगवंताच्या ईच्छेनें जें झालें तें बरोबरच होणार॰

बोधवचने

ईच्छाशक्तीचा विकास करण्यासाठीः पहिल्या प्रथम निश्चय, निर्धार आणि निग्रह आवश्यक आहे॰

मनाचे श्र्लोक

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावें ||
मना बोलणें नीच सोशीत जावें ||
स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावें ||
मना सर्व लोकांसि रे निववावें || ||

देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी ||
मना सज्जना हेचि क्रीया धरावी ||
मना चंदनाचे परी त्वां झिजावें ||
परी अंतरीं सज्जनां नीववावें || ||
क्रमशः

Friday, January 9, 2009

श्रीतुळसीची आरती

|| श्रीतुळसीची आरती ||
जय देवी जय देवी जय माये तुळसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी || धृ ||

ब्रह्मा केवळ मुळीं मध्यें तो शौरी |
अग्रीँ शंकर तीर्थे शाखापरिवारीँ |
सेवा करिती भावें सकळही नरनारी |
दर्शनामात्रें पापें हरती निर्धारीं || ||
जय देवी जय देवी जय माये तुळसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी || धृ ||

शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी |
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी |
तव दलविरहित विष्णूं राहे उपवासी |
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासीँ || ||
जय देवी जय देवी जय माये तुळसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी || धृ ||

अच्युत माधव केशव पीतांबरधारी |
तुझिया पूजनकाळीं जो हे उच्चारी |
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी |
गोसावी सुत विनवी मजला तूं तारीं || ||
जय देवी जय देवी जय माये तुळसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी || धृ ||

श्रीगोंदवलेकर महाराजांचे विचार सौंदर्य
परमेश्र्वराचा होणें म्हणजे मीपणानें मरणें

बोधवचने
'चिंतन' हां चिंतामणी आहे
तुम्ही ज्याचे चिंतन कराल तेच तुम्हाला प्राप्त होईल
जीवनांचे वाळवंट किंवा नंदनवन करण्याचे सामर्थ्य चिंतनांत आहे
--- श्री वामनराव पै

मनाचे श्र्लोक

मना पापसंकल्प सोडूनी द्यावा ||
मना सत्य संकल्प जीवीं धरावा ||
मना कल्पना ते नको वीषयांची ||
विकारें घडे हो जगीं सर्व छी छी || ||
नको रे मना क्रोध हा खेदकारी ||
नको रे मना काम नाना विकारी ||
नको रे मना सर्वदा अंगिकारूं ||
नको रे मना मत्सरू दंभ भारुं || ||

Sunday, January 4, 2009

श्रीहरितालिकेची आरती

|| श्रीहरितालिकेची आरती ||

जय देवी हरितालिके |
सखी पार्वती अंबिके |
आरती ओंवाळीतें |
ज्ञानदीपकलिके || धृ ||

हरअर्धांगीं वससी |
जाशी यज्ञा माहेरासी |
तेथें अपमान पावसी |
यज्ञकुंड़ीं गुप्त होसी || १ ||

जय देवी हरितालिके |
सखी पार्वती अंबिके |
आरती ओंवाळीतें |
ज्ञानदीपकलिके || धृ ||


रिघसी हिमाद्रीच्या पोटीं |
कन्या होसी तूं गोमटी |
उग्र तपश्चर्या मोठी |
आचरसी उठाउठी || २ ||

जय देवी हरितालिके |
सखी पार्वती अंबिके |
आरती ओंवाळीतें |
ज्ञानदीपकलिके || धृ ||

तापपंचाग्निसाधनें |
धूम्रपानें अधोवदनें |
केलीं बहु उपोषणें |
शंभु भ्रताराकारणें || ३ ||

जय देवी हरितालिके |
सखी पार्वती अंबिके |
आरती ओंवाळीतें |
ज्ञानदीपकलिके || धृ ||

लीला दाखविसी दृष्टी |
हें व्रत करिसी लोकांसाठी |
पुन्हां वरिसी धुर्जटी |
मज रक्षावें संकटीं || ४ ||

जय देवी हरितालिके |
सखी पार्वती अंबिके |
आरती ओंवाळीतें |
ज्ञानदीपकलिके || धृ ||

काय वर्णूं तव गुण |
अल्पमति नारायण |
मातें दाखवीं चरण |
चुकवावें जन्ममरण || ५ ||

जय देवी हरितालिके |
सखी पार्वती अंबिके |
आरती ओंवाळीतें |
ज्ञानदीपकलिके || धृ ||


श्रीगोंदवलेकर महाराजांचे विचार सौंदर्य |
देहबुध्दीला म्हणजे विषयाला धरुन असतें तें सकाम
बोधवचने
आपण शरीररुप आहोत हा भ्रमच वाइटाचे मूळ आहे ।


मनाचे श्लोक
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा |
पुढें वैखरी राम आधीं वदावा|
सदाचार हा थोर सांडूं नये तो |
जनीं तोचि तो मानवी धन्य होतो || ३ ||
मना वासना दुष्ट कामा नये रे |
मना सर्वथा पापबुध्दी नको रे |
मना सर्वथा नीति सोडूं नको हो |
मना अंतरीं सार वीचार राहो || ४ ||
क्रमशः