Thursday, May 28, 2009

पसायदान

पसायदान

आतां विश्र्वात्मकें देवें | येणें वाग्यज्ञें तोषावें ||
तोषोनी मज द्यावें | पसायदान हें || १ ||
जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रति वाढो ||
भूतां परस्परे जडो | मैत्र जिवाचें || २ ||
दुरितांचे तिमिर जावो | विश्र्व स्वधर्म सूर्यें पाहो ||
जो जे वांच्छिल तो ते लाहो | प्राणिजात || ३ ||
वर्षतु सकळ मंगळी | ईश्र्वर-निष्ठांची मांदियाळी ||
अनवरत भूमंडळी | भेट तू भूतां || ४ ||
चलां कल्पत्तरुंचे आरव | चेतना चिंतामणींचे गाव |
बोलते जे अर्णव | पीयूषांचे || ५ ||
चन्द्रमें जें अलांछन | मार्तण्ड जे तापहीन ||
ते सर्वांही सदा सज्जन | सोयरे होतु || ६ ||
किंबहुना सर्वसुखी | पूर्ण होवोनि तिहीं लोकीं ||
भजिजो आदि पुरुषीं | अखण्डित || ७ ||

श्रीगोंदवलेकर महाराजांचे विचारसौंदर्य
चांगले विचार स्थिर ठेवणें कठिण आहे॰

बोधवचने
माणूस हा पशुत्व, मनुष्यत्व व देवत्व हयांचे मिश्रण आहे॰

मनाचे श्लोक
मना सांग पां रावणा काय झालें |
अकस्मात तें राज्य सर्वे बुडालें ||
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगीं ||
बळें लागला काळ हा पाठि लागीं || १३ ||
जिवा कर्मयोगें जनीं जन्म झाला ||
परी शेवटीं काळ घेऊनि गेला ||
महाथोर ते म्रुत्युपंथेंचि गेले ||
कितीएक ते जन्मले आणि मेले || १४ ||