Friday, January 9, 2009

श्रीतुळसीची आरती

|| श्रीतुळसीची आरती ||
जय देवी जय देवी जय माये तुळसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी || धृ ||

ब्रह्मा केवळ मुळीं मध्यें तो शौरी |
अग्रीँ शंकर तीर्थे शाखापरिवारीँ |
सेवा करिती भावें सकळही नरनारी |
दर्शनामात्रें पापें हरती निर्धारीं || ||
जय देवी जय देवी जय माये तुळसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी || धृ ||

शीतळ छाया भूतळव्यापक तूं कैसी |
मंजिरीची बहु आवड कमळारमणासी |
तव दलविरहित विष्णूं राहे उपवासी |
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासीँ || ||
जय देवी जय देवी जय माये तुळसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी || धृ ||

अच्युत माधव केशव पीतांबरधारी |
तुझिया पूजनकाळीं जो हे उच्चारी |
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी |
गोसावी सुत विनवी मजला तूं तारीं || ||
जय देवी जय देवी जय माये तुळसी |
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी || धृ ||

श्रीगोंदवलेकर महाराजांचे विचार सौंदर्य
परमेश्र्वराचा होणें म्हणजे मीपणानें मरणें

बोधवचने
'चिंतन' हां चिंतामणी आहे
तुम्ही ज्याचे चिंतन कराल तेच तुम्हाला प्राप्त होईल
जीवनांचे वाळवंट किंवा नंदनवन करण्याचे सामर्थ्य चिंतनांत आहे
--- श्री वामनराव पै

मनाचे श्र्लोक

मना पापसंकल्प सोडूनी द्यावा ||
मना सत्य संकल्प जीवीं धरावा ||
मना कल्पना ते नको वीषयांची ||
विकारें घडे हो जगीं सर्व छी छी || ||
नको रे मना क्रोध हा खेदकारी ||
नको रे मना काम नाना विकारी ||
नको रे मना सर्वदा अंगिकारूं ||
नको रे मना मत्सरू दंभ भारुं || ||