Friday, October 24, 2008

श्री विष्णूची आरती


श्रीविष्णूची आरती
आवडी गंगाजळें देवा न्हाणीलें
भक्तिचें भूषण प्रेमसुगंध अर्पिलें
अहं हां धूप जाळूं श्रीहरीपुढें
जवं जवं धूप जळे
तवं तवं देवा आवडे
रमावल्लभदासें अहंधूप जाळिला
एकारतिचा मग प्रारंभ केला
सोहं हां दीप ओंवाळू गोविंदा
समाधी लागली पाहतां मुखारविंदा
हरिख हरिख होतो मुख पाहतां
प्रकटल्या या नारी सर्वहि अवस्था
सभ्दावालागी बहु हां देव भुकेला
रमावल्लभदासें अहं नैवेद्य अर्पिला
फल तांबूल दक्षिणा अर्पिली
तयाउपरी नीरांजनें मांडिली
आरती आरती करूं गोपाळा
मीतूंपण सांडोनी वेळोवेळाध्रु
पंचप्राण पंचज्योती आरती उजळिली
दृश्य हें लोपलें तया प्रकाशांतळिं
आरतीप्रकाशे चंद्र सूर्य लोपले
सुरवर नभीं तेथे तटस्थ ठेले
देवभक्तपण दिसें कांहीं
ऐशापरी दास रमावल्लभ पायीं
आरती आरती करूं गोपाळा
मीतूंपण सांडोनी वेळोवेळाध्रु